You are currently viewing डेगवे-आंबेखणवाडी जि.प.प्राथमिक शाळेत शारदोत्सव उत्साहात संपन्न..

डेगवे-आंबेखणवाडी जि.प.प्राथमिक शाळेत शारदोत्सव उत्साहात संपन्न..

बांदा

सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावच्या जि.प.प्राथमिक शाळा आंबेखणवाडी नं. ३ च्या शाळेत सरस्वती पुजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सर्व प्रथम ब्राह्मणाच्या मंत्रघोषात सरस्वतीचे पुजन केले.या पुजेला राज्यस्तरीय ग्रंथमित्र तथा डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस श्री.उल्हास देसाई यांच्या शुभहस्ते पुजा करण्यात आली.
हि शाळा गेली ५० वर्षे डेगवे,आंबेखणवाडी,फणसवाडी,जांभळवाडी डिंगणे-धनगरवाडी,बामरवाडी या दुर्गम परीसरातील इयत्ता १ ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांना विद्यादानाचे पवित्र कार्य करीत आहे.त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी शासकीय कार्यालयात,विविध उच्चपदावर काम करीत आहेत.शिवाय डॉक्टर,इंजिनिअर,खाजगी क्षेत्रात काम करीत आहेत.हे भुषण आहे.
या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना पिळणकर यांनी उपस्थित स्थानिक ग्रामस्थ,महिला,लहान मुले यांचे स्वागत केले.शाळेत सजावट सुंदर केली होती.रांगोळी घातली होती.करोना महामारीच्या काळात बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु झाल्यावर पालक,शिक्षक,विद्यार्थी यामध्ये उत्साह दिसून आला.दिवसभरात ग्रामस्थ,महिला,विद्यार्थी यांनी सरस्वतीचे दर्शन घेऊन तिर्थ प्रसादाचा लाभ घेतला.शिवाय महिलांनी फुगडी घातली तर ग्रामस्थांनी भजन व आरती केली.या वेळी लहान मुलांना बक्षिसे देऊन कौतुकाची त्यांच्या पाठीवर थाप दिली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री वामन देसाई,गोपाळ देसाई,विलास देसाई,विनय देसाई,शामसुंदर देसाई,किशोर तथा बाळू देसाई,तुकाराम देसाई,तेजस देसाई,सौ.वैशाली देसाई,वर्षा देसाई सौ.सुमन देसाई,वंदना देसाई,दिपक देसाई,उल्हास देसाई,मंगलदास देसाई,नारायण देसाई,मंदार देसाई व इतर ग्रामस्थांनी विशेष परीश्रम घेतले.आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना पिळणकर यांनी मानले.

सोबत:फोटो.
*उल्हास देसाई*
सरचिटणीस,डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा