वैभववाडी
कोकण इतिहास परिषद मागील एक दशकापासून कोकणातील स्थानिक इतिहासाचे संवर्धन व संशोधनाचे कार्य सातत्याने करत आहे. स्थानिक संशोधक व संशोधनाला चालना देण्यासाठी वर्षभर कोकण इतिहास परिषदेच्या विविध उपक्रमापैकी दरवर्षी कोकणच्या विविध भागात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाते. यावर्षी दिनांक २४ ऑक्टोबर, २०२१ रोजी बी.के.बिर्ला महाविद्यालय (स्वायत्त) कल्याण जि. ठाणे येथे अकराव्या “एक दिवसीय राष्ट्रीय परिषदे”चे आयोजन”करण्यात आले आहे. आभासी पद्धतीने होणाऱ्या परिषदेत कोकणच्या प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत झालेल्या राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक, सागरी, ऐतिहासिक,आर्थिक,शैक्षणिक इतिहासावर आधारित विषयावर तसेच कोविड१९ या समकालीन महत्वाच्या विषयावर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये शोधनिबंध सादर होणार आहेत. या परिषदेत प्राध्यापक, संशोधक,इतिहासाची आवड असणाऱ्या व्यक्ती तसेच पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी आपले शोधनिबंध सादर करू शकतील.
कोंकण इतिहास परिषद दरवर्षी कोकणचा इतिहास व भारतीयविद्या यांमध्ये महत्वाचे संशोधन कार्य करणाऱ्या जेष्ठ संशोधकांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करत असते. या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार प्रच्याविद्या अभ्यासक डॉ. कुमुद कानिटकर यांना दिला जाणार आहे. दरवर्षी कोकणच्या इतिहासावर आधारित असणाऱ्या संशोधन ग्रंथाला पुरस्काराने सन्मानित केले जाते तसेच परिषदेत सदर होणाऱ्या उत्कृष्ट शोध निबंध सादर करणाऱ्या संशोधकांना पुरस्कार देण्यात येतो . कोंकण इतिहास परिषद “कोंकण इतिहास पत्रिका” ही शोधनिबंध पत्रिकाही प्रकाशित करीत असते.
शोध निबंध सादर करणाऱ्या व्यक्तीसाठी, प्रतिनिधीसाठी रु.४०० आणि विधार्थी प्रतिनिधीसाठी रु.२०० शुल्क निश्चित केले आहे. कोकण इतिहास परिषदेचे आजीव सभासद शुल्क रु.३००० भरून आजीव सभासद होता येईल. कोइप.चे अध्यक्ष सदाशिव टेटविलकर,सचिव डॉ.विद्या प्रभू ,कोईप.शाखा सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री. प्रकाश भाऊ नारकर (9168341644), सचिव श्री.प्रवीण पारकर (9420822553),कार्यकारी समिती सदस्य प्रा.श्री.एस.एन.पाटील (9834984411) व श्री.रणजित हिर्लेकर (9423303670) यांनी परिषदेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संशोधक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींनी आपले संशोधन सादर करावेत असे आवाहन केले आहे.