You are currently viewing शून्यातून विश्व निर्माण करणारी नवदुर्गा नगरसेविका सौ.ममता मनमोहन वराडकर

शून्यातून विश्व निर्माण करणारी नवदुर्गा नगरसेविका सौ.ममता मनमोहन वराडकर

मालवणच्या सामाजिक, राजकीय, आणि उद्योग क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं ते आजच्या नवदुर्गा उद्योजक म्हणून नावारूपास आलेल्या मालवणच्या नगरसेविका सौ.ममता मनमोहन वराडकर. मनमोहन वराडकर हे पूर्वी मालवण मध्ये वडापाव व्यवसाय व रिक्षा व्यवसाय देखील करायचे. काहीकाळ त्यांनी नोकरी सुद्धा केली. कष्ट,चिकाटी, आणि मेहनतीतून त्यांनी आशीर्वाद कॅटर्स हा उद्योग सुरू केला. राजकीय सामाजिक क्षेत्रातही त्यांनी ठसा उमटवला आहे.

१९९४ साली लग्न करून वराडकर कुटुंबात आल्यानंतर आपले पती श्री.मनमोहन वराडकर यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या पत्नी सौ ममता वराडकर यांनी पतीच्या व्यवसायात लक्ष घालण्यास सुरुवात केली. पतीच्या खांद्याला खांदा लावत त्या यशस्वी उद्योजक बनल्या, इतकेच नव्हे पतीचे गुण अंगिकरात राजकीय क्षेत्रातही त्यांनी दमदार एन्ट्री घेत गेले एक दशक त्या मालवण नगरपालिकेत नगरसेविका म्हणून लोकांच्या सेवेत राहिल्या आहेत. सामाजिक कार्यातही त्या अग्रेसर असतात.

मालवण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक महत्वाचे प्रेक्षणीय स्थळ. पर्यटकांची वर्दळ वर्षभर सुरूच असते, त्यामुळे मेढा मालवण येथे सुरू केलेला अस्सल मालवणी जेवण आणि होम स्टे यामुळे त्या यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आल्या. मालक म्हणून कोणताही बडेजाव न करता वराडकर दाम्पत्य स्वतः जेवण बनवितात, त्यामुळे त्यांच्या हातची चव पर्यटकांना आवडते आणि त्यातूनच त्यांच्याकडे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. आशीर्वाद कॅटर्स च्या माध्यमातून त्यांनी रुचकर आणि अस्सल मालवणी स्वादिष्ट जेवणाचा स्वतःचा एक ब्रँड तयार केला आहे.

देवीचे रूप हे प्रत्येक स्त्री मध्ये दिसून येते, मग ती स्त्री आई असो, पत्नी, बहीण, अथवा मुलगी असो. अशाच मालवण येथील यशस्वी उद्योजिका, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील असामान्य व्यक्तिमत्त्व, नगरसेविका सौ.ममता मनमोहन वराडकर या आजच्या युगातील नवदुर्गा आहेत.
संवाद मिडियाकडून त्यांना भावी वाटचालीसाठी आणि यशस्वी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा…

प्रतिक्रिया व्यक्त करा