उत्तरप्रदेश लखीमपुर खेरी येथे केंद्रतील भाजप सरकार मधील गृहराज्य मंत्री यांचे पुत्र यांनी शांततेने आंदोलन करणा-या शेतकऱ्यांना गाडीने चिरडून ठार केले सदर पिडीत कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी जाणा-या काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांना अटक करून हिटलरशाहीचे राज्य असल्याचे योगी सरकारने दाखवून दिले तसेच केंद्र सरकारने केंद्रीय गृहराज्य मंत्री यांचा राजीनामा सुद्धा घेतला नाही आणि आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालवला आहे. याचा निषेध म्हणून 11 ऑक्टोबर 2021 रोजी महाविकास आघाडी तर्फे महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा महाविकास आघाडीच्या तिनही पक्षानी बंद पुकारला असून सदर बंदला जिल्ह्यातील व्यापारी बांधवानी पाठिंबा द्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी केले आहे.

सिंधुदुर्ग बंद ला व्यापाऱ्यांनी पाठिंबा द्यावा; सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळा गावडे यांचे आवाहन
- Post published:ऑक्टोबर 10, 2021
- Post category:बातम्या / सावंतवाडी
- Post comments:0 Comments