जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य लेखक, कवी श्री श्रीकांत दीक्षित यांचा अप्रतिम लेख
🌈💕💦💢🌀🎀💫🦚🍃💢
माणसाच्या जीवनात रंग तसेच रंगसंगतीला खूप महत्व आहे. जसा माणसाचा स्वभाव गरम व थंड प्रकृतीचा आहे तसेच या रंगामध्ये दोन्ही प्रकृती आहेत. या सर्व प्रकृतींचा योग्य समन्वय साधला तर इंद्रधनूचे सप्तरंग व्हायला वेळ लागत नाही. नाहीतर रंगाचा बेरंग होऊन जातो.
या रंगसंगतीवर मनुष्याच्या स्वभावात बदल होतो. हे देखील खरे आहे. त्यामुळे घर रंगवताना विशिष्ट रंगसंगती ठरवली जाते. साधे जर बघीतले तर आपल्या भावना जशा बदलतील तशा मनपटलावर वेगवेगेळे रंग तरंगतात. विशिष्ट स्वभावाचे लोक पटकन लवकर एकत्र येतात. कारण त्यांचे अंतःकरणातील भावतरंग एकाच रंगाचे असतात. भक्तीरसात म्हटले जाते, *”आज रंगात रंगू दे श्रीहरी”*
उष्ण गटातील रंग लाल, ♥️पिवळा,🥎 केशरी🎈. हे रंग पाहताच माणसांच्याभावना कशा होतात??..
हे उत्साही रंग आहेत. हे रंग पाहताच आळस, मरगळ जाऊन जोश भरला जातो. कारण सूर्यकिरणांशी मिळते जुळते रंग आहेत. सिग्नलवर थांबायचा इशारा करणारा लाल रंग लक्षवेधी असतो. जणू काय रागाने पहात असतो. पिवळा रंगाचा दिवा पाहता थोडा धीर येतो तर हिरवा रंग आला कि जीव भांड्यात पडल्याची भावना.
जिथे आपल्याला विश्रांती- एकाग्रतेची आवश्यकता आहे, अशा ठिकाणी शीतल रंग आपल्या कामी येतात. शक्यतो बेडरूम, आॅफीसेस, मंदिरे अशा ठिकाणी हि रंगसंगती वापरली जाते. शक्यतो निळा!!…
रंगसंगतीला पेहरावामध्ये खास महत्व आहे. हे विशेषकरून स्रीयांच्या बाबतीत अधिक. पुर्वी बायकांना एकाच रंगात मॅचिंग लागायचे. ते पाहण्यासाठी चार चार वेळा उन्हात नेऊन बघायचे. पण आता रंगसंगती बघितली जाते. लाल बरोबर निळा, हिरवा क्वांट्रास मॅचिंग!!…हे भारी दिसते. जसे विरूद्ध स्वभावाचे नवरा बायको. असं क्वांट्रास मॅचिंग संसारात असल्याशिवाय संसारात देखील मजा येत नाही. एकाची उणीव दुसरा भरून काढतो, त्याप्रमाणे हे रंगदेखील समतोल साधतात. मॅचिंग करण्याच्या नादात आलेला एकसुरीपणा या जोडय़ांमुळे जाऊन, वातावरणात एकदम चैतन्य निर्माण होते.
थोडक्यात रंगाविषयी
निळा: निळा रंग धैर्याचे प्रतीक आहे. 🔵
हिरवा: हिरवा रंग गती आणि चंचलतेचे प्रतीक आहे. 🟢
लाल: लाल रंग उत्तेजनेचे प्रतीक आहे. 🔴
गुलाबी: लाल आणि पांढरा या रंगाच्या मिश्रणातून बनलेला हा रंग कोमलतेचे प्रतीक आह.🟣
पांढरा: श्वेत चंद्र, श्वेत ससा, श्वेत हंस….पांढरा रंग म्हटला की हे सगळे समोर येते. पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे. ⬜
पिवळा: पिवळा रंग मीलन आणि आत्मीयतेचे प्रतिक आहे.🟡
काळा: अंधार भीतीनिदर्शक आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे.⚫
🎨🎨🎨🎨🎨
*श्रीकांत दीक्षित*