केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदीया यांच्या उपस्थित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले उदघाटन
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री देसाई,परिवहनमंत्री अनिल परब, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, होते उपस्थित
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुप्रतिक्षित असलेल्या चिपी येथील ‘सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड विमानतळाचे’ आज केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदीया यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.या सोहळ्यासाठी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे या पहिल्या विमानाने चिपी विमानतळावर आगमन झाले होते.पालकमंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि इतर मंत्र्यांचे स्वागत केले.
या उदघाटन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,पालकमंत्री उदय सामंत, परिवहनमंत्री अनिल परब, कृषिमंत्री दादा भुसे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्य मंत्री आदिती तटकरे, खासदार अरविंद सावंत, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे माजी मंत्री दीपक केसरकर, आम.वैभव नाईक, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर, जि. प. अध्यक्षा संजना सावंत,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदीया हे दिल्ली येथून व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे जोडले गेले होते. यावेळी विनीत सूद यांनी सुद्धा सर्व मंत्रिमहोदयांचे स्वागत केले. प्रास्ताविक राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केले.