राजकीय षडयंत्र असल्याची राजू मसुरकर यांची प्रतिक्रिया
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शनिवार दिनांक 9 ऑक्टोबर विमानतळाच्या उद्घाटनाचे शुभारंभ मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व केंद्रीय विमान उड्डाण मंत्री ज्योतीराजजी शिंदे यांच्या शुभहस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून याप्रसंगी माजी खासदार व काँग्रेसचे माजी ऑल इंडिया काँग्रेस सरचिटणीस सुधीर जी सावंत यांना शुभारंभाला प्रशासनाकडून निमंत्रण न दिल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजी पसरली असून ही बाब दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी व्यक्त केली आहे.
खरं म्हणजे 1995 सालमध्ये काँग्रेस पक्षाचे त्या काळातील पंतप्रधान नरसिंहराव असताना त्या काळातील तत्कालीन खासदार सुधीर सावंत यांनी 1992-93 सालामध्ये देशात अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले होते.
त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आता असलेले उत्तर गोव्यामध्ये दाभोळी विमानतळ हे नेवी या सैनिकी विमानतळावरती प्रवासी विमाने उतरून आजपर्यंत ते चालू असल्याने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने मेजर व आता असलेले ब्रिगेडियर सुधीर सावंत खासदार यांनी तत्कालीन विमान उड्डाण मंत्री व पर्यटन मंत्री यांना कै माधवराव सिंधिया यांच्याकडे मागणी करून गोव्याच्या विमानतळाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये चिपी येथे व्हावे अशा प्रकारची मागणी करुन व त्या काळामध्ये माधवराव सिंधिया यांनी सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा व्हावा यासाठी तत्कालीन खासदार सुधीर सावंत यांनी मागणी करून माधवराव सिंधिया यांच्याकडून घोषित करून मंजूर करून घेण्यात आले होते.
नंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुंबईवरून हेलिकॉप्टरद्वारे या पर्यटन जिल्ह्याची पाहणी करून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तत्कालीन खासदार सुधीर सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी इंटरनॅशनल विमानतळ व्हावे व त्यासाठी विमानतळाला लागणारी हवी तशी उपलब्ध असणारी जागा त्यांनी ते विमानतळ तत्कालीन केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया यांच्याकडून मंजूर करून घेण्यात आले होते.
यासाठी केंद्रीय पथक जागेची पाहणी करण्यासाठी विमान उड्डाण अथोरिटी चे अधिकारी यांनी चिपी विमानतळाच्या जागेची पाहणी केल्यानंतर त्याचा अहवाल केंद्र सरकारला पाठवून त्यानंतर ते चिपी विमानतळ अधिकृतरित्या तत्कालीन केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया यांना खासदार सुधीर सावंत यांच्या मागणीनुसार मंजुरी देण्यात आली होती.
ही जागा गोव्यातील सध्या असलेले दाबोळी विमानतळ सैन्यदलाच्या नेवीच्या विमानतळाच्या अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विमानतळाची जागा मंजुरी देण्यात आली होती.
त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे इंटरनॅशनल विमानतळ गोव्या मधून जाणार म्हणून सर्व गोव्यातील जनतेने तीव्र आंदोलने करून सिंधुदुर्ग जिल्ह्यालगत बांदा पत्रदेवी पासून चार पाच किलोमीटर असलेली गोवा राज्यातील मोफा विमानतळाची जागा त्यावेळच्या सरकारने सुचवून व जागा दाखवून इंटरनॅशनल विमानतळ गोवा मोफा येथे मंजूर करून घेण्यात आले.
त्यामुळे इंटरनॅशनल एअरपोर्ट केंद्र सरकारचा नियम दीडशे किलोमीटरच्या आत दोन विमानतळ इंटरनॅशनल होऊ शकत नाही हे गोवा सरकारने वेळीच खबरदारी घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इंटरनॅशनल एअरपोर्ट व्हावे हे स्वप्न ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे होते त्या स्वप्नाला धूळ चारली गेली.
त्यानंतरच्या काळामध्ये विविध पक्षातील राजकीय नेत्यांनी हे विमानतळ पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न झाला असून यासाठी सर्व पक्षातील राजकीय नेतेमंडळींनी या विमानतळाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे स्वप्न साकार होण्यासाठी प्रयत्न केले असून याचा शुभारंभ शनिवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
यासाठी ब्रिगेडियर माजी खासदार सुधीर सावंत यांना प्रशासनाने निमंत्रण न देणे हे खेदजनक असून ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचे स्वप्न साकार होण्यासाठी आंबा, काजू तसेच मत्स्य पर्यटन तसेच आपल्या लोकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी साकारलेले स्वप्न काँग्रेस पक्षाचे तत्कालीन खासदार सुधीर सावंत यांना या विमानतळाच्या शुभारंभाला आमंत्रण न देणे हे प्रशासनाकडून दुर्दैवच म्हणायचे की काय? की यामागचे राजकीय षडयंत्र आहे अशी शंका तमाम सिंधुुदूर्गातील जनतेला येऊ लागली आहे असे मत जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी केले आहे.
केंद्रीय पर्यटन व विमान उड्डाण मंत्री कै. माधवराव शिंदे यांच्याशी चर्चा करताना काँग्रेस नेते राजू मसुरकर, तत्कालीन कै. जिल्हाध्यक्ष रमाकांत सावंत, सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार व्ही जाॅर्ज, गोवा राज्य भवन येथे 1996 चाली सिंधुदुर्ग विमानतळाला मंजुरी दिल्यानंतर शुभेच्छा देताना