जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना
मनकर्णिका मनस्विनी ती झाशीची राणी
कधी न झाली अशी असे हो पहा तिची कहाणी
ती दुर्गा दुर्गटभारी इंग्रजास भिडली
महान आहे पराक्रम हो अद्भूत ती राणी…..
रयतेची ती होती लाडकी होती पहा न्यायी
फेकून सारी पहा बंधने रूढी मुक्त झाली
भरीस नाही पडली कुणाच्या नाही कुणा भ्याली
एकमेव ही इतिहासातील मर्दानी झाशीवाली …
दामोदर घेतला पाठीशी मारली अशी टांग
घोडा होता अती मायाळू फेडीले त्याने पांग
मेरी झॅांसी नही दूंगी गर्जली पहा नार
ओळखून ते होते इंग्रज झॅांशी ची तलवार ….
न्यायाचे हो राज्य स्थापिले.. झुगारून त्या रूऱ्ढी
लढून उरली नाही हरली , झुकली नाही कुडी
चंद्र सूर्य जोवरी तळपतील राहील तिचे नाव
झाशी म्हणता स्फुरण चढते जिव्हारी लागतो घाव..
कैक होऊन गेल्या भारती नाव ठेवूनी गेल्या
देह ठेवला देशास्तव पण नाहीच पहा मेल्या
हृदयी आहे दीप तेवता चिरंजीव झाल्या
भारतियांच्या स्मृतीतून त्या कधीच नाही गेल्या …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)