सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 150 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 58.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 4000.0325 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 54 (3902), सावंतवाडी – 69 (4307.1), वेंगुर्ला – 96 (3228.2), कुडाळ – 52 (3930), मालवण – 150 (4389.96), कणकवली – 18 (4266), देवगड – 17 (3411), वैभववाडी – 15 (4566) पाऊस झाला आहे.
आतापर्यंत सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात 4 हजार 566 मि.मी. झाला असून त्याखालोखाल मालवण, सावंतवाडी, कणकवली, कुडाळ, दोडामार्ग आणि देवगड तालुक्यात पाऊस झाला आहे. सर्वात कमी वेंगुर्ला तालुक्यात 3 हजार 228 पूर्णांक 2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे