*सोपे नसते*
———————————-
परंपरेवर स्वतः घसरणे सोपे नसते
रस्त्यावरती काच पसरणे सोपे नसते
रूढी रितींचा असतो पगडा मनामनावर
देवकल्पना अशी त्यागणे सोपे नसते
टिळे धर्माचे फोल म्हणून पुसून आलो
घरी नांदत्या असे वागणे सोपे नसते
अजून येतो वास फुलांचा पुस्तकातूनी
कातरवेळी तुला विसरणे सोपे नसते
फुलण्याआधी मिटून जाती कळ्या येथल्या
घाव फुलांचे असे घसरणे सोपे नसते
लेक माहेरची क्षणात सासरची झाली
बंध तोडून असे मिसळणे सोपे नसते.
श्रीनिवास गडकरी
रोहा पेण
09130861304
@ सर्व हक्क सुरक्षित