You are currently viewing केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सिंधुदुर्ग वासीयांकडून पाठवणार 5000 पत्रे!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सिंधुदुर्ग वासीयांकडून पाठवणार 5000 पत्रे!

वायडब्ल्यूएचे अध्यक्ष तेजस घाडीगांवकर यांचे थेट गडकरींना पत्र!

कणकवली

जिल्ह्यातील रस्त्यांच्या अवस्थेचा परिणाम येथील विकास आणि उद्योग व्यवसायावर होत आहे. याकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा लक्ष वेधण्यासाठी त्यांना जिल्ह्यातील नागरिकांकडून 5000 हजार पत्रे पाठविली जाणार असल्याची माहिती वायडब्ल्यूए अर्थात युथ वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष तेजस घाडीगांवकर यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी गडकरी यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात तेजस घाडीगांवकर यांनी म्हटले आहे की, नितीनजी गडकरी साहेब, युथ वेल्फेअर असोसिएशन, ही एक सामाजिक संस्था असून युवकांसाठी सामाजिक, शैक्षणिक व रोजगार विषयक समस्यांवर कार्यरत आहे. आमच्या संस्थेमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार स्वयंरोजगार तसेच येथील सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी गावपातळीवर समित्यांची स्थापणा करुन शासकिय यंत्रना आणि तळागाळातील सर्वसामान्य व्यक्ती यांमधील दरी कमी करून ग्रामपातळीवरील सर्वांगीक विकासाला हातभार लावण्याचे काम अग्रेसर पणे सुरू आहे.

सदर उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अवलोकन केले असता असे लक्षात येते की, या जिल्ह्यात समृद्ध निसर्ग, दर्जेदार पर्यटन स्थळे, उद्योगासाठी पोषक परीस्थिती व स्वयंरोजगारासाठी मोठी संधी याठिकाणी उपलब्ध होऊ शकते. सध्या या जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गाच्या विकासाचे काम प्रगतिपथावर आहे, परंतु सिंधुदुर्गच्या अंतर्गत भागातील परिस्थिती पाहता या महामार्गाला जोडणा-या जिल्ह्यातल्या अंतर्गत रस्त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. एकंदरीत सिंधुदुर्गचा व्यवसायिक व पर्यटनदृष्ट्या विकास घडवायचा असल्यास अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व विकास करणे अत्यावश्यक आहे. या अवस्थेकडे जिल्ह्यातील सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी व कोणतेही मंत्री महोदय लक्ष देत नाहीत, त्यामुळे होणारे व्यावसायिक नुकसाणाबाबत योग्य तो विचार करीत नाहीत. म्हणून युथ वेल्फेअर असोसिएशन वतीने अंतर्गत रस्ते सुधारणा व त्यांच्या विकासाकरता आपल्याला ग्रामस्थांच्या मार्फत 5000 विनवणी पत्रे आपणास पाठवून सदर विषयांबाबत आपले लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण सिंधुदुर्गातील ग्रामस्थांच्या विनंतीला दाद देऊन जिल्ह्याच्या आंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घ्यावा, हीच आमची अपेक्षा असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा