कणकवली
मनसेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्यावर दाभोली वेंगुर्ले येथील मूळ गावी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मनसे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली. उपरकर यांनी मनसेकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. श्री दाभोलकर हे पक्षाच्या स्थापनेपासून मनसेत कार्यरत होते त्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी विषेश भर दिला होता अनेक विषयावर त्याने प्रखरपणे आंदोलन उपोषणे केली होती.