वेंगुर्ले
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज पोटनिडणुक घेण्यात आली. या निवडीसाठी विधाता सावंत विरुद्ध शितल आंगचेकर अशी लढत झाली यामध्ये सावंत यांना ७ मते तर आंगचेकर यांना १० मते मिळाल्याने त्या निवडून आल्या आहेत. दरम्यान तुषार सापळे या निवडणुकीत तटस्थ राहिले. सध्या रिक्त असलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी आज ५ ऑक्टोबर २०२१ रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली. या एका जागेसाठी शितल आंगचेकर, विधाता सावंत व साक्षी पेडणेकर या तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीमध्ये तिन्ही अर्ज वैध ठरविण्यात आले. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळी साक्षी पेडणेकर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने आंगचेकर विरुद्ध सावंत अशी थेट लढत आहे, असे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पानवेकर यांनी जाहीर केले.
उर्वरित अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी या खुर्चीवर कोणाची वर्णी लागते याकडे वेंगुर्ले शहरवासियांच्या नजरा लागल्या आहेत. वेंगुर्ले येथील मच्छिमार्केटचे बांधकाम करताना प्रस्थापित झालेल्या त्या १५ गाळेधारकांवर नुतन सागररत्न मत्स्य बाजारपेठेतील गाळे देताना अन्याय झाला. असा आरोप करत अस्मिता राऊळ यांनी आपल्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा २६ ऑगस्ट रोजी दिला होता. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. दरम्यान आजच्या निवडीच्या वेळी वेंगुर्ले न. प. च्या सभागृहात या पोट निवडणुकीच्या विशेष सभेत नगराध्यक्ष दिलीप गिरप, उमेदवार विधाता सावंत, शितल आंगचेकर, गटनेते सुहास गवंडळकर, प्रकाश डीचोलकर, प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, श्रेया मयेकर, शैलेश गावडे, कृतीला कुबल, साक्षी पेडणेकर, पूनम जाधव, स्नेहल खोबरेकर, कृपा मोंडकर, अस्मिता राऊळ, तुषार सापळे, आत्माराम सोकटे, संदेश निकम, सुमन निकम उपस्थित राहून भाग घेतला. यावेळी मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे व अन्य अधिकारी उपस्थित होते.