You are currently viewing शेती विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर, विरोधकांच्या गोंधळातच मतदान पूर्ण

शेती विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर, विरोधकांच्या गोंधळातच मतदान पूर्ण

नवी दिल्ली :

अखेर राज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयक विरोधकांच्या गोंधळातच मंजूर करण्यात आले आहे. विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. पण कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी विधेयक सादर केले आणि त्यावर मतदान घेऊन मंजूर करण्यात आले आहेत.
वादग्रस्त ठरलेले शेती विधेयक अखेर राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. एकीकडे विरोधकांनी जोरदार विरोध केला तर दुसरीकडे सत्ताधारी भाजप सरकारने विधेयक मंजूर करणारच रेटा लावून धरला. अखेर राज्यसभेत मोठ्या गोंधळात कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक आणि शेतकरी (सशक्तिकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन आणि कृषि सेवा विधेयक सादर केले. या दोन्ही विधेयकांवर मतदान घेऊन मंजुरी देण्यात आली आहे.
तर दुसरीकडे, राज्यसभेत सभागृहाची वेळ वाढविण्याच्या मुद्यावरून एकच वाद पेटला होता. कृषी मंत्र्यांनी उद्या उत्तर देण्याची विरोधी पक्ष नेते गुलाम नवी आझाद यांनी मागणी केली. पण या गोंधळात कृषी मंत्री नरेंद्र तोमर देत आहे चर्चेला उत्तर देण्यासाठी उभे राहिले.

त्यामुळे संतापलेल्या विरोधकांनी राज्यसभेच्या उपसभापतींसमोरील माईकच तोडून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पण, अखेर या गोंधळातच दोन्ही विधेयक मंजूर झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा