You are currently viewing दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मुलांनी दुमदुमल्या.

दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मुलांनी दुमदुमल्या.

सोमवार दिनांक चार ऑक्‍टोबरला शाळा सुरू होणार या आनंदात आठ दिवस आधीच जिल्हा तालुका केंद्र व शाळा स्तरावर नियोजन सुरू होते. कुडाळ तालुक्यातील वेताळ-बांबर्डे केंद्रातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पावशी मिटक्याची वाडी शाळेतही आठ दिवस आधीपासूनच उत्साहाचे वातावरण होते शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मानसी सावंत यांनी शाळा व्यवस्थापन समिती, पालक वर्ग व शिक्षक वृंद यांच्या मदतीने उत्कृष्ट असे नियोजन केले.
शालेय परिसर स्वच्छता वर्ग सफाई व वर्ग सजावट करून घेतली सोमवार दिनांक ४ ऑक्‍टो सकाळी ८.३० वाजताच मुख्याध्यापक शिक्षक वृंद व काही पालक वर्ग शाळेत उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी दरवाज्यांना तोरणे लावली वर्गासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या. व्हरांड्यात पायघड्या घालून त्यावर (सात पावले) पानांची आकर्षक पद्धतीने मांडणी करण्यात आली.
सोशल डिस्टन्स च्या सर्व नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांना रांगेत वर्गात नेण्यात आले प्रथम सॅनिटाइजर ने हात निर्जंतूक करून त्यांचे ऑक्सी मीटर च्या साह्याने तापमान मोजण्यात आले त्यानंतर शालेय जीवनावर आधारित सप्त पावलांची ओवी म्हणण्यात आली व या ओवीचा तालावर एक एक पाऊल पुढे टाकत सर्व विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन झाले प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण करण्यात आले त्यांना गुलाब पुष्प व गोड खाऊ भरवून अतिशय मंगलमय व उत्साहपूर्ण वातावरणात सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका श्रीमती मानसी सावंत यांनी सर्व विद्यार्थी व पालकांना परिपत्रकानुसार निर्देशित करण्यात आलेल्या सूचना समजावून सांगितल्या व त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याविषयी सूचना दिली.
हा प्रवेशोत्सव कार्यक्रम मुख्याध्यापिका श्रीमती मानसी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वृंद पदवीधर शिक्षक श्री परुळेकर सर पदवीधर शिक्षक श्री सातार्डेकर सर उपशिक्षक श्रीमती महानंदा चव्हाण व उपशिक्षक श्रीमती आदिती मसुरकर यांच्या सहकार्यातून उत्तम रीतीने पार पडला. या कार्यक्रमासाठी व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती सानिका देसाई उपाध्यक्ष श्री गणेश वायंगणकर सदस्य श्री वैष्णव तेली श्री श्याम सुंदर करगुटकर श्री सतीश देसाई श्री दीपक गोरले संजना महाडेश्वर सौ पंडित सौ शर्मिला वायंगणकर , सौ मोरजकर, सौ साक्षी पंडित अंगणवाडी सेविका सौ. दिपा फोंडके उपस्थित होत्या.
सर्व पालक वर्गातून कौतुकाचे पडसाद उमटले विद्यार्थीही शिकण्यासाठी खूप उत्सुक होते इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतचे ९०% विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित होते. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत पर्यंत अध्यापनाचे कार्य सुरू राहिले. तद्नंतर शाळा सोडण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा