You are currently viewing माणसातला माणुस शोधु…..
  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

माणसातला माणुस शोधु…..

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्तिविकास मंच सदस्या विश्वविख्यात अभिनेत्री, “बियोंड सेक्स” या गाजलेल्या पुस्तकाच्या लेखिका सोनल गोडबोले यांचा लेख

दुपारची १२ ची वेळ.. सविता घरातील कामे आवरुन बॅंकेत काहीतरी काम आहे म्हणुन घराच्या बाहेर पडली. पार्कींगमधे स्कुटी सुरु करायला गेली तर आज तीही बया तिच्यावर रुसली होती.. काही केल्या स्टार्ट व्हायचे नाव घेइना.. शेजारीच असलेल्या गॅरेजवाल्याला स्कुटीची किल्ली देउन ती बॅंकेत निघुन गेली. ऱिक्षातुन उतरली तर तिला डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं झालं .. ती फुटपाथवर बसली आणि तिला जरा बरं वाटल्यावर तिथुन उठली आणि दोन पावले चालणार तितक्यातच ती चक्कर येउन धाडकन खाली पडली.. शेजारी बसलेला माणुस ( भिकारी) पाण्याची बाटली घेउन धावला आणि तिच्या तोंडावर पाणी मारलं . हा सगळा प्रकार पाहुन वाटलं कोणावर कशी वेळ येइल ना.. आपण करत असलेल्या गर्वाचे घर कायमच खाली असते. कायमच बाटलीतले पाणी हवे म्हणणारे आपण आज त्या भिकाऱ्याजवळच्या पाण्याने सविताचा जीव वाचवला होता.. माणसातील माणुसकी किती महत्वाची असते हे त्या कळकट माणसाने दाखवुन दिले..

*सोनल गोडबोले*
*लेखिका.. बियॉन्ड सेक्स*

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 10 =