You are currently viewing झाराप-पत्रादेवी महामार्गावर अपघात, नारूर मधील दोघे युवक जखमी…

झाराप-पत्रादेवी महामार्गावर अपघात, नारूर मधील दोघे युवक जखमी…

सावंतवाडी

वेत्ये-सोनुर्ली तिठा येथे झालेल्या अपघातात नारूर ता. कुडाळ येथील दोघे युवक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी झाराप-पत्रादेवी बायपासवर घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,साईश शिवदास सावंत वय १८,व शुभम शिवदास सावंत वय २१, अशी त्यांची नावे आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झाराप-पत्रादेवी बायपासवर दुचाकीची दिशादर्शक दगडाला धडक बसुन झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले.गोवा येथून कुडाळ नारुरच्या दिशेने ते येत होते. एकाच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा