You are currently viewing व्यासंगाचा संग

व्यासंगाचा संग

असती आपुल्या मनात
विचार एक ना हजार
का जडतो हा मनाला
अट्टाहासाचा तो आजार

साध्य करण्या असाध्य ते
असावा व्यासंगाशी संग
संमर्पणाची मनी भावना
रहावे स्वकार्यातची दंग

संग करणे मानव गुणधर्म
खुले व्यक्तिमत्त्व प्रगतीने
ध्यास असता करावे कर्म
यश वैचारिक व्यासंगाने

अभ्यास अध्ययन असती
व्यासंगाचे ते खरे सोबती
वाचन मनन चिंतन करता
यशाची होते सहज प्राप्ती

व्यासंग समाजसेवेचा देतो
नाव गाव मानवास मोठे
व्यासंगात कधीच नसते
नुकसान ना कुठले तोटे

व्यासंग वाट नसे अनोळखी
व्यासंगाने तो जीवना आकार
एकमेवाद्वितीय घडे कार्य
करता व्यासंगाचा हा स्विकार

©[दिपी]
दीपक पटेकर, सावंतवाडी
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा