You are currently viewing आंडेर ….(लेक)

आंडेर ….(लेक)

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची अहिराणी भाषेतील काव्यरचना

लेक जलमता घर ,घर दुखमा बुडसं
घरदारले दुखस कसं संकट पडस
गुननी ती खान तिले तिले लोटतस दूर
माय मयाना डोयामा येस आसूसना पूर..

 

वंश ना त्तो दिवा, नही,नही लावतंस दिवा
तरी का रे देवबा तू,धरा असा उभा दावा
काट्याकुट्या येचिसन करे मायले मदत
माय जाता कामले ती लेकरेसले समायस…

घरम्हानं बठ्ठ काम नही शिकाडत कोनी
आपसुक शिकस ती इ..त..ली ती ऱ्हास गुनी
भांडा कुंडा चुला पानी काम करे हरएक
तरी दुखस पोटमां अशी अभागी ती लेक …

खान गुननी तरी बी दुजाभाव तो कितला
तिना वाचून संसार लोके करी दखा भला
करे कितली कायजी मायबापनं दुखनं
बठ्ठं समायी लेस ती तिनं दुखस ना मनं…

 

ती ते संसारना मेढ्या उभा “सरा” से घरना
देस मानोसले जन्म दुख सोसी सासरमां
माहेर बी कष्टाम्हानी नि सासर विचारूच नका
ती देव से घरमा तुमन्या झाकी लेस चुका….

 

तिना वाचून आंगन सुनं हुयीज जास ना
नका मारू पोटमाच तिना नही काही गुन्हा
दोन्ही घरनां से झेंडा लौकिक तो फडफडे
सोनानी से लड बरं चमकस सारी कडे…

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

This Post Has One Comment

  1. Alka Darade

    भावनाप्रधान कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा