सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व सिंधुदुर्ग जिल्हा दूध उत्पादन संघ एम के गावडे यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ गोकुळ संस्थेस भेट दिली. यावेळी गोकुळ संस्थेचे चेअरमन विश्वास पाटील व एम डी- डि वि घाणेकर यांनी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी संचालक मंडळ यांच्या समोर मांडल्या. यावेळी दूध संघाचे चेअरमन एम के गावडे यांनी देखील जिल्ह्यामध्ये दूध उत्पादन वाढण्यासाठी गोकुळने आम्हाला वेळोवेळी मदत करावी. जेणेकरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 20 हजार लिटर दूध मिळू शकेल. याचा फायदा आपल्या गोकुळ संस्थेस होईल. त्यामुळे आम्हाला दूध उत्पादनासाठी म्हशी उपलब्ध व्हाव्यात. तसेच चारा मुबलक मिळावा व दूध संकलनासाठी ही उपाययोजना व्हावी. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी गोकुळ जिल्हा सहकारी दूध संघच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला आमचा नेहमी सहकार्य राहील कुठलीही अडचण आल्यास आम्ही नेहमी आपल्याला सहकार्य करू. कारण अडचणीच्या काळात गोकुळ संस्थेला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सहकार्य केले आहे. त्यामुळे आपण सुचवलेल्या पर्यायाची लवकरात लवकर अंमलबजावणी करून आपल्याला वेळोवेळी सहकार्य करू, असे आश्वासन गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिले. यावेळी गोकुळचे संचालक बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील व शेतकरी टिपु सावंत आब्रड ,आप्पा देसाई दोडामार्ग ,पिंटू सावंत फोंडाघाट, सुरेश हरम किंजवडे, नारायण गावडे बांदा, ज्ञानेश्वर परब मडूरा शेतकरी उपस्थित होते