झारीतील शुक्राचार्यांचे काय?
सोशल क्लब, स्पोर्ट्स क्लबच्या नावावर जिल्ह्यात काही ठिकाणी जुगाराचे अड्डे सुरू आहेत. संवाद मीडियाने वारंवार याबाबत आवाज उठवला होता. परंतु झारीतीलच शुक्राचार्य असल्याने त्या क्लब वर कधी कारवाई होत नव्हती. गेल्या काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते संदीप धर्मोजी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना लेखी स्वरूपात निवेदन दिले आणि त्याच्या प्रति वरिष्ठ पातळीवर देखील पाठविल्या होत्या। त्यामुळे जिल्हा पोलिस खात्याला अखेर जाग आली आणि आज दुपारी १.०० वाजता कणकवलीत साईबाबा स्पोर्ट्स क्लब येथे पोलिसांनी धाड टाकली.
साईबाबा स्पोर्ट्स क्लब वर गेल्या आठ दिवसांपूर्वी गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी देखील धाड टाकली होती. परंतु त्यातून काय निष्पन्न झाले हे समजू शकले नाही. झारीतील शुक्राचार्य असलेले कणकवली येथील खाकी वर्दीचा “वरात काढणारा धापू” याला तब्बल ४५०००/- रुपयांचा हफ्ता सुरू असून २००००/- रुपये हफ्ता स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या एका कर्मचाऱ्याला आहे. त्यामुळे धाड टाकण्यापूर्वी सदर क्लब चालविणाऱ्या सूचना मिळत असतात. त्यामुळे धाड टाकल्यावर मुद्देमाल मिळणे मुश्किल होते.
जोपर्यंत झारीतील शुक्राचार्य कार्यरत असतील तोपर्यंत अवैध धंद्यांना आळा बसणार नाही, अवैध धंदे बंद करायचे असतील तर प्रथम “वरात काढणारे धापू” पहिल्यांदा धापू करावे लागतील.