You are currently viewing ग्रामसभेत जलजीवन मिशन कार्यक्रमांबाबत जनजागृती

ग्रामसभेत जलजीवन मिशन कार्यक्रमांबाबत जनजागृती

सिंधुदुर्गनगरी

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामिण भागातील प्रत्येक कुंटुबाला नळाव्दारे शुध्द व शाश्वत पेयजल उपलब्ध व्हावे यासाठी 2 ऑक्टोंबर 2021 राजी होणाऱ्या ग्रामसभेत जलजीवन मिशन कार्यक्रमांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

            दिनांक 2 ऑक्टोंबर 2021 राजी होणाऱ्या ग्रामसभेत जलजीवन मिशन कार्यक्रमांबाबत जनजागृती याबाबतचे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा  व स्वच्छता विभागाने दिनांक 24 सप्टेंबर 2021 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाव्दारे देण्यात आले आहेत. या ग्रामसभाचा प्रमुख उद्देश -तीस ते चाळिस वर्षासाठी  वैयक्तिक नळ जोडणीव्दारे शाश्वत व शुध्द पेयजल यंत्रणा निर्माण करणे, पाणी  व स्वच्छता समिती गठीत करण्यासाठी पन्नास टक्के महिला प्रतिनिधी व दुर्बल घटकांतील प्रतिनिधी यांना संधी देणे, सहभागी सदस्य यांना पेयजल स्त्रोतांचे महत्व विशद करणे, ज्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात भुजल व भुपृष्ठ जल उपलब्ध आहे. अशा ठिकाणी स्वंतत्र पाणी पुरवठा योजना व जलशुध्दीकरण यंत्रणा कार्यान्वित करणे तसेच ज्या ठिकाणी अवर्षण प्रवण क्षेत्र किंवा पाणी टंचाई क्षेत्रात शाश्वत पेयजल उपलब्ध करण्याच्या द्ष्टीने शुध्दीकरण व वितरण व्यवस्था निर्माण करणे, विखुरलेल्या वाड्या वस्त्या, डोंगराळ भाग या ठिकाणी सौर उर्जा आधारित स्वंतत्र नळपाणी योजना तयार करणे हा आहे.

            या ग्रामसभेत स्वच्छता व आरोग्य यांचे महत्व  विशद करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाणी गुणवत्ता प्रयोगशाळेबद्दल माहिती देण्यात येणार आहे. पाण्याचा पुनर्वापर, नारिकांना पेयजल स्त्रोतांचे महत्व इत्यादी विषयाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी जलजीवन मिशन कार्यक्रमांबाबत प्रभावी जनजागृती करुन ग्रामसभेत जलस्त्रोंत संधारण , गावांतील पाणी पुरवठा योजनेची कामे, देखभाल दुरुस्ती अशा विविध विषयांचा समावेश करण्याबाबत सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिल्या आहेत. जिल्हा वासियांनी दिनांक 2 ऑक्टोबर 2021 रोजी ग्रामसभेत सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा