You are currently viewing महिला वसतीगृहासाठी इमारत भाडेतत्वार घेण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

महिला वसतीगृहासाठी इमारत भाडेतत्वार घेण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

राज्यातील लोकसंख्या व नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृहाची मागणी लक्षात घेता मुंबई उपनगर जिल्हा- 6 मुंबई शहर, ठाणे, पुणे या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 4 व राज्यातील उर्वरित 32 जिल्हयांसाठी प्रत्येकी 1 याप्रमाणे 50 वसतीगृहांना 100 प्रवेशित क्षमतेची इमारत भाडेतत्वार उपलब्ध करुन घेऊन नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतीगृह ही सुधारित योजना राबविण्यात येत आहे.

            शासन निर्णयामध्ये परिशिष्ट अ मध्ये योजना राबविणाऱ्या संस्थासाठी मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. तसेच विशिष्ट ब मध्ये संस्थाकडून भाडेतत्वार चालविण्यात येणाऱ्या वसतीगृहासाठी  मंजूर करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व अटी याबाबत तरतूद नमूद करण्यात आहे.

      तरी सिंधुदुर्ग येथे नोकरी करणाऱ्या महिलांसाठीचे वसतीगृह भाडेतत्वावरिल इमारतीमध्ये सुरु करण्यासाठी जिल्हास्तरावर इच्छूक संस्थाकडून प्रस्ताव मागविण्यात येत असून याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय 02362 228869 सिंधुदुर्गनगरी येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा