You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस नेते रतन कदम यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची निवासस्थानी घेतली भेट

राष्ट्रवादी काँग्रेस नेते रतन कदम यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची निवासस्थानी घेतली भेट

पक्ष बांधणी मजबूत करण्यासंदर्भात मंत्री आव्हाडांनी केले मार्गदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ वाढविण्यासाठी निष्ठेने काम करू ; रतन कदम

सिंधुदुर्ग

राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा सृष्टी परिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रतन कदम यांनी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास कामासंदर्भात चर्चा करून पक्ष वाढविण्यासंदर्भात व मजबूत संघटना बांधणी करण्यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी रतन कदम यांना मार्गदर्शन केले.

येत्या काळात रत्नागिरी, रायगड, मुंबई तसेच अनेक जिल्ह्यातून रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे कार्यकर्ते माझ्या संपर्कात असून मोठ्या प्रमाणात आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. याचे कारण आंबेडकरी चळवळीचे नेते बिकाऊ, लाचार झाल्यामुळे आंबेडकर चळवळ संपवण्याचे काम हे नेते करत आहेत. परंतु आंबेडकर चळवळ ही पुरोगामी विचारांची चळवळ असून आम्ही सध्या जातीयवादी पक्षाला दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या माध्यमातून आंबेडकर चळवळ चालविण्याचा निर्णय घेतल्यामुळे आम्ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे, असे रतन कदम यांनी बोलताना सांगितले.

जसे आम्ही आरपीआय पक्षामध्ये निस्वार्थी व निष्ठेने काम केले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राहून आंबेडकर चळवळ वाढवण्यासाठी त्याच निष्ठेने व निस्वार्थीपणे काम करणार आहोत. तसेच आंबेडकरी जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे आश्वासन रतन कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिले. त्यामुळे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रतन कदम यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा