You are currently viewing प्रा सुषमा मांजरेकर यांचा कोरोना योद्धा शिक्षक पुरस्काराने सन्मान…

प्रा सुषमा मांजरेकर यांचा कोरोना योद्धा शिक्षक पुरस्काराने सन्मान…

महाराष्ट्र गोवा सीमेवरील गोव्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी कोरोना काळात केले होते अतुलनीय कार्य

सावंतवाडी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताह अंतर्गत बांदा भाजप मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात आरोस विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका प्रा. सुषमा प्रवीण मांजरेकर यांना कोरोना शिक्षक योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

जि. प. चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक संचालक प्रमोद कामत व जि प. सदस्या शर्वनी गावकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. कोविड च्या संकट काळात सामाजिक बांधिलकीतुन गोवा बोर्डाच्या सीमा भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा सातार्डा केंद्रावर घेऊन गोवा बोर्डाला सौ. मांजरेकर यांनी सहकार्य केले होते. या सहकार्यामुळे गोव्यात 10 वी, 12 वी त शिकणाऱ्या सीमा भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान वाचण्यस मदत केली होती. कोरोना काळात 12 विच्या अभ्यास चे स्वतः व्हीडिओ बनवून वॉट्सअँप च्या माद्यमातून आपल्या आरोस शाळेत सुरु ठेवलेला ऑनलाईन अभ्यास उपक्रम, कोविड सेंटर वरील सेवा व प्रसंगी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सुरु असलेले ज्ञानदानाचे काम.याची दखल घेऊन बांदा मंडळ भाजप तर्फे सौ मांजरेकर यांना कोरोना योद्धा शिक्षक पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.

यावेळी जि प सदस्या उन्नती धुरी, माजी सभापती प्रकाश कवठणकर, उपसभापती शितल राऊळ, बांदा भाजप मंडळ अध्यक्ष महेश धुरी, कार्यक्रमाचे संयोजक सागर प्रभू, भाजप तालुका उपाध्यक्ष शेखर गावकर, जावेद खतीब, शेरले सरपंच उदय धुरी, सातोसे सरपंच बबन सातोस्कर, किरण प्रभू, काशिनाथ केरकर, कवठणी उपसरपंच अजित कवठनकर, भाजप विभाग अध्यक्ष ज्ञानदीप राऊळ, जि प माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, बाळू सावंत, काशिनाथ केरकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा