जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य कवी दीपक पटेकर यांची हृदयस्पर्शी काव्यरचना
किती सोसावे ते घाव हृदयावरी मी तरी
का पाषाण हृदयास मी मानावे माझ्या तरी
वेदना अंतरीच्या खोल मीच माझ्या जाणतो
दुःख मजलाही होतसे चेहरा हसला जरी
नको मारू तू फुंकर भळभळत्या जखमेवर
फुंकर मारूनही जखम जिवंतच असे उरी
दिवा वंशाचा मुलगा मुलीस पोटात मारतील
संकटात माय बापाच्या हात मुलीचा पाठीवरी
जाणतेपणी तू दिलेल्या कशा विसरू वेदना
काटे बोचती मनास मन मरणासन्न काट्यावरी
कुठे कुठे घालू टाके फाटक्या या गोधडीस
पडे उघडे हे अंग घेता पांघरूण ती अंगावरी
किती सांगाव्या व्यथा मी गाडलेल्या मनातल्या
व्यथा माझ्याच मनाच्या हसतात माझ्यावरी
©[दिपी]✒️
दीपक पटेकर,सावंतवाडी
८४४६७४३१९६