फोंडाघाट
श्री.राधाकृष्ण मंदीर फोंडाघाट मध्ये अखंड हरीनाम सप्ताह रविवार पासून उत्साहात सुरू आहे. या हरिनाम सप्ताहामुळे फोंडाघाट मध्ये यावेळी एक चैतन्य निर्माण होते. बाजारपेठेत मंदीराजवळ केलेली रोशणाई अद्वितीय असते.
सप्ताहाची सुरुवात हरिनामाच्या गजराने केली जाते
फोंडापेठेत “श्रीराधाकृष्ण अमुची माता उभी देवळात” यावर्षी आर के ग्रुपने भजन स्पर्धा ठेवली आहे. त्याचे रविवारी रात्री उद्घाटन झाले. ३ दिवस चालणाऱ्या या स्पर्धचा समारोप मंगळवारी नंबर काढून बक्षीस वितरणाने होईल.असा सोहळा आजच्या कोरोना काळात सर्व नियम पाळुन पार पाडला जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकणी यांनी दिली.