You are currently viewing भावगीत

भावगीत

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य प्रा.डॉ.जी.आर.उर्फ प्रवीण जोशी यांची काव्यरचना

अनादी अनंत किती युगाचे
चल सखे गाऊ गीत प्रेमाचे ।। धृ ।।

श्रुष्टीने दिला हा बगीचा
ऋतु बंध आला हा फुलायचा
प्रेमीकाना बहाणा झुलायचा
तुझे माझे गीत एका सुरांचे
।। 1।।

तु नभी अंगणी चंद्रकोर
मी शुक्रतारा भाव विभोर
चांदण्यात हसला तो चकोर
असेच आपण जगायचे ।। 2 ।।

विविध ऋतुने नटले नक्षी
झाडावर गीत गातो पक्षी
सजीव चैतन्य असेल साक्षी
असेच आपण खेळायचे ।। 3।।

तुझ्याच ओठी माझे प्रेमगीत
परंपरेची आहे ही चालरीत
सगळीच गोष्ट उघड गुपित
विरहाने जरासे झुरायचे ।। 4 ।।

प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी

अंकली बेळगाव
कॉपी राईट
9164557779

This Post Has One Comment

  1. डॉ जी आर जोशी

    मनःपूर्वक धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा