You are currently viewing सोमवार दि. 27 सप्टेंबर 2021 रोजी मा. ना. सतेज ऊर्फ बंटी पाटील दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सोमवार दि. 27 सप्टेंबर 2021 रोजी मा. ना. सतेज ऊर्फ बंटी पाटील दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळा गावडे यांची माहिती

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे काँग्रेसचे संपर्क मंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे गृह(शहर),गृहनिर्माण,परिवहन, माहिती तंत्रज्ञान,संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री मा. ना. सतेज ऊर्फ बंटी पाटील हे सोमवार व मंगळवार दि. 27 व 28 सप्टेंबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक आढावा बैठकी घेणार आहेत.
पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा बैठक, भारत नेट आढावा बैठक, म्हाडा/पंतप्रधान आवास योजना आढावा बैठक, परिवहन व एस.टी. महामंडळ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक या शासकीय कार्यक्रमा व्यतिरिक्त काँग्रेस पक्ष संघटने संदर्भात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे व जिल्ह्य़ातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या समवेत चर्चा करणार आहेत. पुढील होऊ घातलेली सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक त्या संदर्भातील पक्षाच्या रणनीती संदर्भात विचार विनिमय करणार आहेत. त्याच प्रमाणे लवकरच होणाऱ्या नगरपंचायत/ नगरपरिषद निवडणूका त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या संदर्भात काँग्रेसची रणनिती काय असावी या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. जिल्ह्य़ात काँग्रेस पक्षाला पुन्हा पुर्वीचे वैभव प्राप्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मा. ना. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी दौरा आयोजित केला आहे..
या दौऱ्यात काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 5 =