तालुकाप्रमुखांची माहिती; निरवडे, सांगेलीसह उपजिल्हा रुग्णालयाचा समावेश…
सावंतवाडी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यासाठी तीन रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. यात सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासह निरवडे व सांगेली ग्रामीण रुग्णालयाला रूग्णवाहीका मिळाल्याने रुग्णांची होणारी गैरसोय टळणार आहे,असा विश्वास शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी व्यक्त केला. दरम्यान यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी विशेष प्रयत्न केले होते.
राज्य सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १४ रुग्णवाहिका मंजूर झालेल्या आहेत. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य आपत्ती व्यवस्थापन, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार दीपक केसरकर यांचे विशेष प्रयत्न आहेत. सावंतवाडी तालुक्यातील निरवडे व सांगेली ग्रामीण रुग्णालया सह सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आमदार दिपक केसरकर यांनी रुग्णवाहिका मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार विनायक राऊत पालकमंत्री उदय सामंत यांनी सहकार्य केल्यामुळे या रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. जनतेची गैरसोय टाळण्यासाठी रुग्णवाहिका प्राप्त झाल्याने जनतेच्या वतीने सर्व मान्यवरांचे अभिनंदन करत असल्याचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी म्हटले आहे.