You are currently viewing फोंडाघाट मार्गाच्या दुरुस्तीसाठी सोमवारी निर्णय

फोंडाघाट मार्गाच्या दुरुस्तीसाठी सोमवारी निर्णय

फोंडाघाट

देवगड-निपाणी राज्य मार्गावरील फोंडाघाट-हवेलीनगर साई मंदिर ते औद्योगिक प्रशिक्षण या मार्गावरील खड्डे चिरा फुटीने न करता डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी अजित नाडकर्णी यांनी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बासूतकर यांनी निधीअभावी तात्पुरते खड्डे बुजवण्यात येतील, तरीही यावर मार्ग काढू असे आश्वासन दिले.
चिरा फुटीने खड्डे बुजवले जातील, असे आंदोलनकर्ते अजित नाडकर्णी यांना सांगण्यात आले,  मात्र खड्डे बुजविण्याचेच असतील तर डांबरीकरणनेच काम करा, असा हट्ट ग्रामस्थांनी धरला आहे. दरम्यान यावर चर्चा करून मार्ग काढू असा विश्वास अभियंता बासुतकर यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा