भाजपा आमदार नितेश राणे यांनी घेतला पुढाकार
■ ५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत पंचायत समितीत होणार राजिस्टेशन
■ तिन्ही तालुक्यात केले जाणार आरोग्यकार्ड चे वाटप
■ १३५० आजारावर ५ लाखापर्यंत उपचार मिळणार मोफत
■आम.नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
■ मतदारसंघातील ४६ हजार ३९१ लाभार्थीनची पहिल्या यादीत निवड
कणकवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रत्येक घटकांचा विचार करून शासकीय योजना राबवित आहेत.” आयुष्यमान भारत” ही विविध १३५० आजारांवर मोफत उपचार देणारी महत्वपूर्ण योजना केंद्र सरकारची आहे. यात ५ लाख रुपया पर्यंतचे उपचार मोफत दिले जाणार आहेत. ही योजना कणकवली, देवगड, वैभवाडी या माझ्या मतदारसंघात ५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या एका महिन्यात राजिस्टेशन करून, आरोग्य कार्ड काढून ही योजना सुरू केली जाणार आहे. मतदारसंघातील ४६ हजार ३९१ लाभार्थीनची या योजने साठी निवड झाली आहे, त्यांचे राजिस्टेशन करून या योजनेचा लाभ देणार असल्याची माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली. ते zoom अँप द्वारे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत आयुष्यमान भारत या केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा जनतेला कसा होईल हे स्पष्ट केले. ते म्हणाले, या योजनेचा फायदा जनतेला व्हावा यासाठी कणकवली, देवगड, आणि वैभववाडी या तिन्ही पंचायत समिती मध्ये स्वतंत्र टेबल लांबून यंत्रणा कार्यरत केली जाईल. आयुष्यमान भारत चे अधिकारी आणि कर्मचारी तेथे येतील दिवसाला सुमारे १५०० पर्यंत लोकांचे थँब घेऊन हे राजिस्टेशन होईल. त्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते,पदाधिकारी गावस्थरावर काम करतील आणि ज्यांची नावे या आयुष्यमान भारत च्या योजनेत आलेली आहेत अशा मतदारसंघातील ४६ हजार ३९१ लाभार्थ्यांना टप्प्या टप्प्याने राजिस्टेशन करून घेतील. त्यासाठी रेशनकार्ड किंवा आधार कार्ड चा नंबर देणे गरजेचे आहे. त्यानंतर लाभार्थ्यांची कार्ड येतील ती वाटली जातील मग वर्षभर त्यांना या योजनेचा लाभ मिळेल.
या योजनेत ५ लाख रुपयांचे उपचार मोफत होणार आहेत. त्या साठी सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर सह मुबई पुणे येथील रुग्णालये निवडण्यात आली आहेत. मात्र या योजनेत देशातील त्या-त्या भागात निवडलेल्या कोणत्याही रुग्णालयात तुम्ही उपचार घेऊ शकता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय आणि खासगी अशी १३ रुग्णालये आहेत, तर कोल्हापूर जिल्ह्यातील ५३ आणि गोव्यातील ३४ रुग्णालये आहेत. तर मुंबईत मधील ५९ रुग्णालये आहेत. शासनाने निवडलेल्या या रुग्णालयात १३५० प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार होणार आहेत. ही योजना दोन वर्षे राज्य सरकाने राबविली नाही त्यामुळे राज्यत जनतेचे नुकसान झाले आहे मात्र आता या योजनेचा जनतेला फायदा मिळेलच उपचाराला पैसे नाहीत म्हणून कोणाचे प्राण जाणार नाहीत असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.