You are currently viewing सुवर्णकार व लायंन्स क्लबचे संतोष चौडणकर यांच्या सौजन्याने उभाबाजार येथे निर्जंतुकीकरण.

सुवर्णकार व लायंन्स क्लबचे संतोष चौडणकर यांच्या सौजन्याने उभाबाजार येथे निर्जंतुकीकरण.

सावंतवाडी

शहरातील सुवर्णकारांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आदर्शवत असे सर्व पेढ्या व बाजार बंद ठेवुन सावंतवाडीकरांसाठी योगदान दिले. सुवर्णकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष चौडणकर यांनी उभाबाजार येथे कोरोना प्रतिबंधक नाॅनब्लिच जंतुनाशक फवारणी संजु विरनोडकर टिम मार्फत स्वखर्चाने करुन घेतली.
बँक आँफ इंडीया, वल्लभ नेगगी निवासस्थान, वसंत चौडणकर, प्रसिध्द विष्णु रेडकर घावूक भुसारी दुकान तसेच समाजिक कार्यकर्ते राजु मसुरकर पेढी, दक्षिणाभिमुख हनुमान मंदिर, रघुनाथ मार्केट, वैश्यवाडा पाणद व सर्व सुवर्णकार पेढीवर व वर्दळीच्या ठिकाणी हि फवारणी करण्यात आली.
यासाठी आकाश मराठे व शुभम बिद्रे यांनी योगदान केले. शेखर धारगळकर, दाजी धुरी, किरण हळदणकर, रंजन रेडकर, आबा केसकर, पोकळे, कोरगावकर, बाळा मडगावकर व सुवर्णकारांनी या उपक्रमाचे स्वागत केले व संतोष चौडणकर व संजु विरनोडकर टिमचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 10 =