सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस एनएसयुआयचे अध्यक्ष तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा उर्फ चंद्रकांत गावडे व वकील सौ. निलिमा गावडे यांचे सुपुत्र कौस्तुभ गावडे यांचा आज वाढदिवस. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तरूणपणातच राजकीय प्रवाहात स्वतःला झोकून घेतलेले उभरते युवा नेतृत्व म्हणजे कौस्तुभ गावडे. नम्रपणा, शांत संयमी स्वभाव, अभ्यासूवृत्ती, उच्चविद्याविभूषित, शिक्षण, व्यवसाय, राजकारण, समाजकारणाची आवड असणारे कौस्तुभ गावडे यांनी तरुणपणातच पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. तरुणांनी स्वयंरोजगार करावा, नोकरीच्या मागे न लागता आपल्या जमिनींमध्ये शेतीपूरक उद्योग उभारावेत, तरुणांना योग्य दिशा मिळावी यासाठी त्यांनी वेत्ये येथे कृषी पर्यटन प्रकल्प उभारून एक आदर्श निर्माण केला आहे. कोकणातील, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संस्कृती देश-विदेशातील पर्यटकांना ज्ञात व्हावी, त्यातून पर्यटक आकर्षित व्हावेत व जिल्ह्यात पर्यटन वाढीस लागून युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा हा त्यांचा ध्यास आहे. युवकांना मार्गदर्शन होण्यासाठी त्यांनी स्वतः कृषी पर्यटन प्रकल्प उभा केला आहे.
राजकारणाबरोबरच समाजकारणाची आवड असणारे ध्येय्यवेडे युवा नेतृत्व म्हणून कौस्तुभ गावडे यांनी आपली ओळख निर्माण केली असून भविष्यात जिल्ह्यातील यशस्वी राजकारणी म्हणून कौस्तुभ यांचे नाव घेतले जाईल असे युवा नेते कौस्तुभ गावडे यांचा आज वाढदिवस. संवाद मिडियाकडून कौस्तुभ गावडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!