You are currently viewing सावंतवाडीतील आयसीआयसीआय बँकेचे अधिकारी बेपत्ता…..आत्महत्या की स्टंट?

सावंतवाडीतील आयसीआयसीआय बँकेचे अधिकारी बेपत्ता…..आत्महत्या की स्टंट?

सावंतवाडीतील आयसीआयसीआय बँकेचे उपव्यवस्थापक मनोहर प्रभाकर गावडे हे ओटवणे येथील तेरेखोलनदी वरील पुलाजवळ आपली कारगाडी ठेऊन “रक्कम वसुली न झाल्याने सॉरी, आपण आत्महत्या करत असल्याचे” आपल्या डायरीच्या कागदावरील चिठ्ठीत नमूद करून तीन दिवसांपूर्वी गायब झाले आहेत. बाबल आलमेडा रेस्क्यू टीम व पोलिसांनी नदीपात्रात शोधमोहीम राबवून देखील त्यांचा पत्ता लागलेला नाही, तसेच आजूबाजूला जंगलमय भागात देखील शोध घेण्यात आला आहे. तीन दिवस उलटले तरी मनोहर गावडे या ३५ वर्षीय तरुणाचा काहीच पत्ता लागत नसल्याने त्यांच्या गायब होण्याचे गूढ वाढले आहे.
नदीपासून जवळपास २५० मीटरवर आपली ह्युंदाई कार उभी करून गाडीत सुईसाईड नोट लिहून ठेवून मनोहर हे बेपत्ता झाल्याने जवळच असलेल्या तेरेखोल नदीपात्रात आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत होता. अथक प्रयत्न करून शोध मोहिमेनंतरही गेले तीन दिवस मनोहर यांचा शोध न लागल्याने मनोहर यांनी आत्महत्या करून जीवन यात्रा संपवली की त्याने आत्महत्येचा स्टंट केला? असा संशय व्यक्त होत आहे. मनोहर सावंतवाडीतील आयसीआयसीआय बँकेत नोकरी करत होता, त्याच्या गायब होण्यामागे आर्थिक व्यवहार हे देखील एक कारण पुढे आले असून अजूनही काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. मनोहर याचा गेले तीन दिवस शोध लागलेला नसून तेरेखोल नदीपात्रात अजूनही शोध मोहीम सुरू असल्याने पोलिसांनी मनोहर बाबत गोपनीयता बाळगली आहे. शोध मोहीम सुरू असतानाच मनोहर गावडे यांच्या व्यक्तिमत्वाची बँकेत तसेच इतर संबंधित व्यक्तींकडे सखोल चौकशी केली जात आहे. मनोहर यांच्या बेपत्ता होण्यामुळे त्यांनी आर्थिक व्यवहारात घोळ केला का? बँकेतील रक्कम वापरली का? आपल्याकडील रक्कम कोणाला दिली अथवा वसूल झाली नाही? असे प्रश्न उपस्थित होत असून याबाबत सखोल चौकशी सुरू आहे.

क्रमशः

प्रतिक्रिया व्यक्त करा