You are currently viewing मी कोण ?

मी कोण ?

  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंचचे राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित लेखक कवी प्रा.डॉ.आर जी उर्फ प्रवीण जोशी यांचा अप्रतिम लेख आणि काव्यरचना.

असा कधी तुम्हाला प्रश्न पडला का हो !
नाही पडला ना ठीक आहे जर पडला तर आपल उत्तर तयार असत. मी आई आहे, मी बाबा आहे, मी मामा, मी मामी अश्या नात्यांची आठवण येते काहीवेळा मी डॉक्टर मी इंजिनियर वकील अश्या हुद्द्याची पेरणी केलेली दिसते. मग नेमका मी कोण तुमचे अस्तित्व काय भूतलावर तुमचे कार्य काय हा अवतार कशासाठी ?
तुमचे जगण्याचे प्रयोजन काय तुम्हाला काय साध्य करायचे आहे ?
असे अनेक प्रश्न विचार करत असाल तर पडतील जरा चिंतन करून बघा जीव आहे म्हणून जगायचे आहे ? मग
मी कोण ?
कधी मुळा पर्यन्त गेला आहात  मी हा सजीव साकार असे सृष्टीला पडलेले स्वप्न ?
ह्या मी साठी चराचर श्रुष्टि व् त्याचे नियम शेवटी सर्व प्रकारचे भोग उपभोगायल तयार झालेल शरीर कणा कणाने झिजते ते शरीर उपभोग्य वस्तु कुठल्या शब्द स्पर्श रूप रस गन्ध ह्या 5 ज्ञानेन्द्रिये 5 कर्मेन्द्रिय उपभोग घेणारा जीवात्मा त्याच्या ठिकाणी असलेल मन उपभोग्य वस्तु पञ्च महाभूते म्हणजे सृष्टी
पिंडी ते ब्रह्माण्डी या न्याया नुसार
जग हे पञ्च भूतिक शरीर हे पण पञ्च भौतिक
येणारा देह हा षड्रिपु
काम क्रोध मद मत्सर लोभ 6 शत्रुनी युक्त असा जीवात्मा जन्म
घेतो हे रिपु जोपर्यन्त आहेत तो पर्यन्त तो सर्व गोष्टीचा आनन्द घेतो ज्यावेळी हे 6 रिपु नष्ट होतील त्यावेळी तो विरक्त होतो
मी पण गळून पड़ते
तो सात्विक होतो कारण खरे ज्ञानप्रकाश अत्म्यवर होत। असतो
मेल्यावर काय होत शरीरातील आत्मा निघुन जातो फक्त पंच्य भौतिक पार्थिव शरीर उरत तरी पण प्रत्येक गोष्ट माझी माझी करत बसतो त्याला माहीत असत शेवट मातीच् होणार आहे तरि तो
जीवात्मा श्रुष्टि चक्रशी बद्ध असतो
आपण मंदिरात जातो गेल्यावर काय करतो घण्टा वाजवतो मी आलो आहे अस देवास वर्दी देतो
दर्शन झाल्यावर आपण प्रदक्षणा
घालतो का तर ह्या फेरयातून सुटका कर असे जणू देवास संगायचे असते
जाताना आपण न चुकता अंगारा लावतो का?
तर देवास तुम्हाला सांगायचे असते की बाबा शेवट तुझी मातीच् होणार आहे राख़ होणार आहे
शेवट ह्या मातीत विलीन होणारा हा जीवात्मा !!!

ह्या थीम वर 5 /6 कविता लिहल्या आहेत यथावकाश पोस्ट करिनच

*मी कोण*

मी सृजनाचा अवतार
करितो जीवनाचा व्यापार

त्रिगुणत्मक मंत्र जपूनी
पंच भुताचे वस्त्र लेवुनी
ष ड रिपूना सोबत घेवूनी
नस्ता अहंकाराचा हुंकार

वंश वेली चे स्वप्न धरुनी
अद्वैत चे बीज पेरूनी
नवु महिने बांड गूळ होवुनी
झालो सृष्टी मधे साकार

येतो उघडा जातो नागडा
नवरंध्रा चा पोकळ घडा
येताना मी रडत येतो
जाताना मी एकटा असतो
येता जाता अंधारा तून
चाचपडतो मी बेकार

रामकृष्ण ही आले गेले
युगान युगे सरून गेले
परंपरेच्या खाईत लो टु न
मी करतो जय जयकार

माझी बायको माझी पोरे
जमीन जूमला माझी घरे
कधी न केला दानधर्म ही
मांडला प्रपंच्याचा अवडंबर

कित्येक आले कित्येक गेले
भल्या भल्यांन गोते खाईले
सर्व काही इथेच ठेवुनी
पाहिले यमाचे द्वार
मी सृजनाचा अवतार

प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी
अंकली बेळगाव
कॉपी राईट

प्रतिक्रिया व्यक्त करा