सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा सयाजीराव म्हणून निवृत्त झालेला विभाग नियंत्रक याची नेमणूक करून संपूर्ण एसटी विभागाची चेष्टा केलेली आहे. करोना च्या काळामध्ये एसटी महामंडळ डबघाईला येत असताना, पुन्हा एकदा निवृत्त कर्मचाऱ्याला खास वेतन देऊन का कामावर रुजू केले जात आहे ?असे कोणता येवढा मोठा दोन वर्षाच्या कार्यकीर्द मध्ये तीर त्यांनी मारला आहे जेणेकरून एसटी प्रशासनाचे करोडो रुपयांच्या फायदा झालेला आहे.
एसटी प्रशासनाकडे सध्या असलेल्या कर्मचाऱ्याला वेतन द्यायला पैसे नसून कर्मचाऱ्यांचे दोन-दोन तीन-तीन महिने वेतन रखडले आहे अशा परिस्थितीमध्ये असा कुठला प्रशासनाचा जावई प्रशासनाने नेमणूक करून त्याचे लाड पुरवले जात आहेत याची माहिती प्रशासनाने लवकरात लवकर जनतेला देणे भाग आहे. असल्या सयाजी रावाला जर कामावर ठेवायचे होते तर एसटी प्रशासनाने त्याला निवृत्त केलेच का असा सवाल आता उपस्थित झालेला आहे.
कुठल्या अशा वरदहस्ते मुळे पुन्हा एकदा विभाग नियंत्रक म्हणून सयाजीरावांची नेमणूक झालेली आहे?
महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना असल्या सयाजीरावला लवकरात लवकर राजीनामा द्यायला भाग पाडल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याचा फायदा कमी आणि एसटी प्रशासनाला त्याचा तोटा जास्ती आहे असे असे नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवळे आहे.