You are currently viewing गणपती विसर्जनासाठी कणकवली नगरपंचायत सज्ज

गणपती विसर्जनासाठी कणकवली नगरपंचायत सज्ज

नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली

कणकवली नगरपंचायतच्यावतीने 19 सप्टेंबर रोजी कणकवली शहरात होणाऱ्या गणपती विसर्जना निमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. कणकवली शहरात प्रामुख्याने पाच ठिकाणी गणपती मूर्ती मुर्तीचे विसर्जन करण्यात येते. यात गणपती साना, मराठा मंडळ जवळ, कनकनगर, नाथ पै नगर, निम्मेवाडी या ठिकाणी नगरपंचायत मार्फत रात्रीच्या वेळी लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. तर कणकवली शहरातील सर्वात जास्त गणपती हे गणपती साना येथे विसर्जन करण्यात येत असल्याने गणपती साना येथे विसर्जन मार्गावर टकले हॉटेल जवळ नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने सायंकाळी 5.30 वाजता प्रांताधिकारी वैशाली राजमाने व तहसीलदार आर. जे. पवार यांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह नगरपंचायत चे नगरसेवक देखील उपस्थित असणार आहेत. तसेच या मार्गावर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली असून, नगरपंचायत चे एक पथक देखील गणपती साण्याच्या ठिकाणी कार्यरत असणार आहे. नागरिकांनी पाण्यात न उतरता या पथकामार्फत तरफ्या वरून गणपती मूर्ती विसर्जन करावे असे आवाहन श्री नलावडे यांनी केले आहे.तसेच गणपती साना येथील स्टेजवर कराओके ची साऊंड सिस्टिम देखील ठेवण्यात आली आहे. नगरपंचायत मार्फत गणेश मूर्ती विसर्जनाची जय्यत तयारी करण्यात आली असून गणेशभक्तांनी कोरोनाचे नियम पाळून गणेशमूर्ती विसर्जनासाठी सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा