You are currently viewing जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष बाप्पा नाटेकर वाढदिवस अभिष्टचिंतन

जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष बाप्पा नाटेकर वाढदिवस अभिष्टचिंतन

बाप्पा नाटेकर निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग उपाध्यक्ष पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर यांचा वाढदिवस काँग्रेस जनसंपर्क कार्यालय सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
बाप्पा नाटेकर हे काँग्रेसचे तरुण व धडाडीचे कार्यकर्ते आहेत मळगाव विभागातील कट्टर काँग्रेस कार्यकर्ते स्वर्गीय राधाकृष्ण नाटेकर या आपल्या वडिलांचा राजकीय वारसा नाटेकर हे समर्थपणे चालवत आहेत असे जिल्हा कॉँग्रेस अध्यक्ष गावडे व आनंद परुळेकर यांनी याठिकाणी मनोगत व्यक्त केले यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेस सरचिटणी आनंद परुळेकर, सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी व सच्चिदानंद बुगडे, मोसिम मुल्ला, मळगाव येथील बापू शिरोडकर व अन्य उपस्थित होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा