सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 10 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 5.2 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3641.1075 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग -8(3601), सावंतवाडी -3(3964.10), वेंगुर्ला -7.60 (2863.80) कुडाळ -1(3508), मालवण -2(3900.96), कणकवली – 8(3994), देवगड -2(3134), वैभववाडी – 10(4163) असा पाऊस झाला आहे.