रक्ताचा नाता
माणसापेक्षा मोठा असता,
माणसाचा नाता.
कारण ता,,
रक्ताचा असता.
शेवटी काय …
माणसाक नाय तर,
माणसाच्या रक्ताक किंमत…!
सख्खो असून माणुसकी इसारलो तरी,
रक्ताचो म्हणून आपलोसो करतात.
कारण,
तेच्या आंगात व्हावणार रक्त…
आपलाच आसा.
रक्त ता,
तेचो रंग एक, ढंग वेगळो.
काम एक पण दाम वेगळो.
वेगळो तेचो…
गुणधर्म….!
आणि तोच तर,,,
भावनेपेक्षा
माणुसकीच्या नात्यात महत्वाचो…!
पण,
माणुसकी हरवलेल्या…
या भरकटलेल्या दुनयेत,
फक्त,
रक्त वेगळा म्हणून
त्या नात्याक, नात्यातल्या प्रेमाक..
नात्यात असलेल्या आंतरिक ओढीक,
कायच किंमत नाय…
किंमत हा ती…रक्ताची..
रक्ताच्या नात्याची…!
(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६⊄