You are currently viewing कळसुलकर मधील मुलांच्या हातांना उमेदीचा अंकुर…

कळसुलकर मधील मुलांच्या हातांना उमेदीचा अंकुर…

सावंतवाडी
कोवीड काळात नकारात्मकता, निराशा आणि अप्रिय बातम्यांचा सर्वत्र भडीमार असतांना कळसुलकर इंग्लिश स्कूल (सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग)मधील विद्यार्थ्यांच्या हातांनी आशेचा अंकुर दाखवला आहे. नवचैतन्याची पालवी आणि उमेदीला धुमारे येऊन मुलांचे मातीत राबणारे हात छोटे-छोटे बगीचे साकारत आहेत.
कोवीडमुळे शाळा बंद आहेत. पण शिक्षण सुरू आहे. पुस्तकी नसले तरी जीवनाला आकार देणारे, जीवन शिक्षण देणारी शाळा नेहमी सुरु असते. भारतीय संस्कृती निसर्गाला दैवत्व देते. मात्र आधुनिक जिवनशैलीच्या नादात निसर्गाशी दुरावले पण येते. सिमेंट काँक्रीटच्या जंगलात मातीशी नाते तुटते आहे; या स्थितीत छोट्याशा घरात कुंडीत का होईना बिजारोपण करणे, रुजवण करणे, पाणी देणे, अंकुरणारे रोप वाढविणे, कोरफड, तुळस या वनौषधी वाढविणे, फुल झाडे लावणे यात मुले व्यग्र आहेत. मुलांना यातून आनंद मिळतो आहे. व़क्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे…….हे पुस्तकातून शिक्षण्यापेक्षा मुले स्वतः अनुभवत आहेत. अनुभव शिक्षणाचे हे धडे गिरविण्यासाठी शिक्षिका ज्योती पावसकरबाई मुलांना प्रोत्साहन देत आहेत. शिक्षकांच्या संकल्पनेला विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे पंख मिळाल्याने अनेक सुंदर कलाकृती घडत आहेत. त्यामध्ये कागदी पुष्पगुच्छ, शो पीस, हस्तकलेच्या वस्तू विद्यार्थ्यांनी साकारल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा