तूच सुखकर्ता
तूच विघ्नहर्ता
काय मागू आता
तूच आहेस दुःखहर्ता
तूच दाता
तूच विधाता
मग का आहे
सर्वत्र साथरोग
आणि
मृत्यूचीच गाथा?
संकटात हे बहुजन
महागाई बेरोजगारी
सर्वत्र फोफावली
उगार शस्त्र एकच
नष्ट कर आता ही
धर्मविद्वेषाची विषवल्ली
दलाल मुजोर झाले
माझा देशच विकू लागले
समाज विभागून हे दानव
थैमान घालू लागले
बुध्दीच्या देवा
आपण शिवपुत्र
ही आठवण ठेवा
देश वाचावा
यासाठी तुम्ही जालीम
उपाय आता करावा
……….. डॉ जयेंद्र परुळेकर