राज्य सरकारने मांडलाय कोरोनाचा “बाजार” तर जिल्हा
घरोघरी जाऊन कोरोना चाचणीचा निर्णय म्हणजे जनतेचा प्रशासनाकडून “छळ”
चाकरमान्यांची होणारी पिळवणूक न थांबल्यास मनसे गप्प बसणार नाही…प्रसाद गावडे
गणेश चतुर्थी च्या पार्श्वभूमीवर जिल्हयात दाखल होणाऱ्या मुंबईकर चाकरमान्यांची प्रशासनाकडून अक्षरशः पिळवणूक चाललेली आहे.रेल्वे स्टेशनवर तासन तास अँटीजन चाचणीसाठी उभे करून दिला जाणारा मनःस्ताप आता घरापर्यंत जाऊन पोहचणार आहे.मुळात अँटीजन चाचणीचा घाट “किट संपवण्यासाठी” घातला जातोय का याबाबत साशंकता आहे.शिवाय चाचणी करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून संसर्ग होणार नाही याचीही काही खात्री नसताना घरापर्यंत जाऊन चाचण्या करण्याचा निर्णय म्हणजे जनतेचा जणू “छळ”च मांडला आहे अशी परिस्थिती आहे.एरव्ही शासकीय कार्यक्रमांना गर्दी चालते,सत्ताधारी पक्षाचे गर्दी जमावणारे मेळावे चालतात मात्र हिंदूंच्या सणांवरती कोण कोणत्या मार्गांनी निर्बंध आणता येतील याचे हर प्रकार शासनाकडून चाललेले आहेत.एकीकडे तिसरी लाट आल्याचे सांगत आरोग्य कर्मचारी कमी करायचे तर दुसरीकडे जिल्हाचे आरोग्य प्रमुख डॉक्टर पद जाणून बुजून रिक्त ठेवायचे,शासकीय गर्दीचे कार्यक्रम आयोजित करायचे, सत्ताधारी पक्षांनी मोठं मोठे मेळावे भरावयाचे आणि सर्व जनतेवर मात्र नाहक निर्बंध लादून वेठीस धरायचं असा एक कलमी कार्यक्रम जिल्हात चालू असून प्रशासन कोरोना उत्सव साजरा करत आहे आणि आपले लोकप्रतिनिधींनी त्याची मजा बघत आहेत हे दुर्दैवी आहे.त्यामुळे जनतेनेच आता या नाकर्त्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्याची गरज असून असल्याची खरमरीत टीका मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.