You are currently viewing जीवनशैली बदला- मिलिंद सरदार

जीवनशैली बदला- मिलिंद सरदार

वैभववाडी :

माणसाने आपल्या जीवनशैलीमध्ये केलेला बदल हेच त्याच्या आजाराचे प्रमुख कारण आहे. आजच्या काळात आरोग्यदायी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे असे प्रतिपादन माधवबाग कम्युनिटी हेल्थचे प्रमुख श्री.मिलिंद सरदार यांनी केले. माधवबाग कणकवली व कुडाळ शाखा आणि सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने शिक्षक वर्ग व कुटुंबीयांसाठी “शिक्षकांची जीवनशैली, त्यांना होणारे विकार व उपचार” या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाईन वेबिनारमध्ये मिलिंद सरदार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार, विहार व सकारात्मक मानसिकता या गोष्टींची गरज असते याबाबत त्यांनी उदाहरणासहित सविस्तर माहिती दिली. शुक्रवार दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी साडेसहा ते रात्री आठ या वेळेमध्ये झूम ॲपद्वारे झालेल्या वेबिनारमध्ये जिल्ह्यातील १२५ शिक्षक प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी मिलिंद सरदार यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा व हृदयविकार हे आजार का होतात त्याची कारणे, त्याची लक्षणे त्यामुळे आपल्याला होणारा त्रास यावर आपल्याला नक्कीच मात करता येईल. यासाठी आज प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केला पाहिजे असे सांगितले. या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
जिल्ह्यातील काही भागांमध्ये लॉकडाऊन असल्याने १ ऑक्‍टोबर ते 15 ऑक्‍टोबर या दरम्यान कणकवली आणि कुडाळ या शाखेमध्ये सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये शिक्षक वर्ग व त्यांच्या कुटुंबीयांसाठी रुपये 750 रुपयाची मोफत तपासणी शिबिर अजून औषधे योग्य दरात दिले जातील सदर तपासणी शिबिर चे सर्व नियम पाळून केले जाईल दररोज फक्त पाच रुग्णांची तपासणी केली जाईल. यासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.

यावेळी माधवबाग कणकवलीच्या डॉ.पल्लवी पाटील, कुडाळ शाखेचे डॉ.अमेय पाटकर यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमा प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. स्मिता झांबरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष प्रा.एस.एन.पाटील यांनी केले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्ष श्री.वामन तर्फे व इतर माधवबागच्या रुग्णांनी आपले अनुभव कथन केले. या वेबिनारच्या यशस्वीतेसाठी माधवबागचे श्री. वैभव पालकर, मिलिंद आईर व त्यांच्या टिमने विशेष परिश्रम घेतले. माधवबाग व मोफत शिबीराच्या अधिक माहितीसाठी कणकवली- 9373183888 व कुडाळ-9011328581 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन माधवबाग व आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा