शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी येत्या 7 ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचं उड्डाण सुरू होणार असल्याची माहिती दिली. तसंच या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राऊत यांनी आमंत्रित केल्याचंही समोर आलं.
त्यानंतर निलेश राणे यांनी मात्र राऊत यांना खडेबोल सुनवत त्यांच्यावर टीका केली. ”आम्ही मिनिस्ट्री ऑफ एवीएशनशी (उड्डाण मंत्रालयाशी) बोललो असून अशी कोणतीही तारीख त्यांनी जाहीर केली नसल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे विनायक राऊत हे बिनडोक आहेत.” अशी जहरी टीका राणेंनी केली आहे.
दुसरीकडे चिपी विमानतळ सुरू करण्यास अखेर डीजीसीआयची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग ते मुंबई हा प्रवास अवघ्या 2500 रुपयात होणार आहे. कार्यवाही वेळेत पूर्ण होऊ शकली नाही म्हणूनच मी पुन्हा एकदा दिल्लीला गेलो होतो. आम्ही हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटलो. त्यांना चिपी विमानतळाचे काम पूर्णपणे झालेले आहे. लायसन्स मिळालेलं आहे असं सांगितल्याचं विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.