जागतिक “सा क व्य” विकास मंचच्या सदस्या डॉ राणी खेडीकर यांची काव्यरचना
ओलांडला होता मी
उंबरठा मोजक्या मापात
गुंतून गेला पदराचा कोना
अंगणाच्या कुंपणात..
हाताला बांधलयं रेशमी कंकण
अंगणातलं ते काटेरी कुंपण
उमलून बहरू की नको मी
की,जपत राहू बेडीचे बंधन
नथेमधला एक एक मोती
सौंदर्य माझे खुलवत गेला
नथेखालच्या गुलाबी जखमेत
श्वास माझा घुसमटत गेला…
टाच मारून प्रश्नांना,आता
मी माझं उत्तर शोधायला हवं
घरट्याच्या दारावर माझ्या नावाचं
एक नवीन अक्षर कोरायला हवं ….
डॉ राणी दुष्यंत खेडीकर
बाल मानस तज्ञा
अध्यक्षा: बालरक्षक प्रतिष्ठान, महाराष्ट्र