You are currently viewing नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या मच्छिमारांना नुकसानभरपाई द्या…

नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या मच्छिमारांना नुकसानभरपाई द्या…

काँग्रेस तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांची निवेदनाद्वारे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांच्याकडे

मालवण

नुकसान भरपाई पासून वंचित राहिलेल्या मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी. तौक्ते चक्री वादळात पुर्णतः नष्ट झालेल्या बोटींसाठी आर्थिक तरतुदींचे निकष बदलून मिळावेत. या मागण्यांसाठी
मालवण तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मेघनाद धुरी यांनी मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन दिले आहे.

यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष इर्शाद शेख उपस्थित होते.लाखो रुपये किंमत असणाऱ्या बोटींसाठी काही हजारात मिळणारी नुकसान भरपाई तुटपुंजी आहे. तरी शासकीय पंचनाम्यातील नुकसान प्रमाणे मदत मिळावी.त्या बरोबर ज्या मच्छिमार बांधवांच्या नुकसानीचे पंचनामे अद्याप झाले नाहीत. कोरोना परिस्थितीमुळे काही ठिकाणी पंचनामे झाले नाहीत. तरी ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्यांना मदत मिळावी अशी मागणीही मेघनाद धुरी यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा