मालवण तालुक्यात सर्वाधिक 85 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 85 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 27.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 3280.41 मि.मी. पाऊस झाला आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 32 (3149), सावंतवाडी – 23(4208), वेंगुर्ला – 19.6 (2349.28) कुडाळ – 43 (2958), मालवण – 85 (3528), कणकवली – 05 (3629), देवगड – 07(2743), वैभववाडी – 08 (3679) पाऊस झाला आहे.