You are currently viewing उत्तरप्रदेश सरकारने केली देशातील सर्वात मोठी फिल्म सिटी बनवण्याची घोषणा

उत्तरप्रदेश सरकारने केली देशातील सर्वात मोठी फिल्म सिटी बनवण्याची घोषणा

लखनऊ :

देशभरात सर्वात मोठा हिंदी फिल्मोद्योग म्हणून मुंबईचं नाव प्रसिद्ध आहे. परंतु आता उत्तरप्रदेश सरकारने देशातील सर्वात मोठी आणि सुंदर फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली आहे. ही फिल्म सिटी गौतमबुद्ध नगर जिल्ह्यातील ग्रेटर नोएडामध्ये बनवण्यात येणार आहे.

लखनऊमध्ये शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उच्च अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सध्याच्या स्थितीत देशाला एका चांगल्या फिल्मसिटीची आवश्यकता असल्याचं सांगितलं. उत्तर प्रदेश ही जबाबदारी घेण्यास तयार असून त्यासाठी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेसवेचं क्षेत्र अधिक चांगलं असल्याचंही ते म्हणाले.

या फिल्मसिटीमुळे निर्मात्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होईल. तसंच रोजगाराच्या दृष्टीनेही अत्यंत उपयोगी प्रयत्य ठरेल. यासाठी त्यांनी जागेसाठी पर्याय उपलब्ध करुन लवकरात लवकर कृती योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्याशिवाय योगींनी मेरठ आणि गाझियाबाद ही दोन शहरं स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्याची महत्त्वाची योजना असल्याचं सांगत, त्यासाठीचं काम लवकर सुरु करण्याचंही या बैठकीत सांगतिलं. तसंच दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेचा आढावा घेत मुख्यमंत्र्यांनी, हे काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा